Gokak Water Falls: बेळगावातल्या गोकाक धबधब्याची नयनरम्य दृश्यं |Karnataka| Rainy Season |Sakal Media
गोकाक (कर्नाटक) : पावसाळ्याच्या दिवसात (Rainy Season )पर्यटकांचे (Toursit)आकर्षण असणारा गोकाकचा धबधबा (Gokak Water Falls)सध्या पूर्णपणे प्रवाहित झाला आहे. बेळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने नदी, नाले आणि ओढे खळाळून वाहत आहेत. त्यामुळे गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होतो. यावर्षी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जून महिन्यातच गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. घटप्रभा नदीवरील (Ghatprabha River)गोकाकचा धबधबा पाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील पर्यटकांच्या बरोबरच अन्य राज्यातील पर्यटकही येतात. घटप्रभा नदी 171 फूट उंचीवरुन खाली कोसळते आणि धबधबा प्रवाहित होतो. धबधब्याची रुंदी 581 फूट इतकी आहे. घटप्रभा नदीवर असणारा झुलता पूल देखील पर्यटकांचे खास आकर्षण आहे. पूर्ण क्षमतेने धबधबा प्रवाहित झालेला असताना त्याचे तुषार काही किलोमीटरपर्यंत उडतात. (Waterfall in Karnataka)
#GokakWaterfalls #Tourist # #Maharashtra #karnataka #RainySeason